प्रलंबित पीक विमा अनुदान वितरणाला गती – शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील शेतकरी 2025 च्या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असताना, सरकारकडून जुन्या प्रलंबित पीक विमा प्रकरणांवर मार्ग काढण्यास गती देण्यात आली आहे. याआधी 2020 सालातील धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्यासाठी तब्बल 134 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर इतर अनेक प्रलंबित पीक विमा निधी वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने राज्य शासनांना … Read more

अवकाळी पावसाचा पुन्हा फटका: रबी हंगामातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान

खरीप 2025 मधील मोठ्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून आशा होती. मात्र अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्यातील शेती संकटात सापडली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा, तसेच अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः लातूर, यवतमाळ, वाशिम, धाराशिव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये हरभरा, ज्वारी, गहू तसेच द्राक्षे व … Read more

पीएम किसान हप्त्यासाठी ‘एआय महाविस्तार’ अ‍ॅप बंधनकारक आहे का? शेतकऱ्यांच्या संभ्रमावर स्पष्टता

अलीकडच्या काळात अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. “एआय महाविस्तार अ‍ॅप डाउनलोड केल्याशिवाय पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळणार नाही का?” असा संदेश काही ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. पीएम … Read more

सरकारी रुग्णालयांतील मोफत उपचार बंद…?

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना मिळणारे मोफत उपचार बंद झाल्याच्या बातम्यांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर अखेर राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 9 फेब्रुवारी 2026 रोजी सुधारित नागरिकांची सनद प्रसिद्ध करत, शासकीय रुग्णालयांतील तपासणी व उपचार हे पूर्वीप्रमाणेच निशुल्क राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 16 जानेवारी 2026 रोजी प्रकाशित … Read more

“पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न? मायबाप जनता धनशक्तीपुढे झुकणार नाही – दिपाली ताई बवले यांचा थेट इशारा”

महाळुंगे पंचायत समिती गणात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गेल्या दोन दिवसांत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप उमेदवार दिपाली ताई बवले यांनी केला आहे.“माझ्या गणातील सर्वच गावांतून सतत फोन येत आहेत. अक्षरशः पैशांचा पाऊस पडतोय. जनसेवेचे व्रत घेत विकासाच्या थापा मारणारे आज पैशांच्या गप्पा मारत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” … Read more

महिला बचत गटांसाठी 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना

वाशिम : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना जास्तीत जास्त 3 लाख 15 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. याच योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात अर्ज मागविण्यात आले … Read more

सल्फर लेपित युरियाच्या 40 किलो पिशवीसाठी 254 रुपये कमाल किंमत निश्चित

नवी दिल्ली:केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी युरियाच्या किमतीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सल्फर लेपित युरियाच्या 40 किलो पिशवीसाठी 254 रुपये कमाल विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत जारी करण्यात आली आहे. हा निर्णय खत नियंत्रण आदेश (Fertilizer Control Order), 1985 अंतर्गत लागू करण्यात आला असून, ही किंमत … Read more

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू

बारामती, प्रतिनिधी — मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या एका खासगी विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला सकाळी साधारण ८:४५ ते ९:०० या वेळेत बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानाला अचानक आग लागली आणि ते कोसळले. या अपघातात विमानातील अजित पवारांसह सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त पीटीआय … Read more

महाडीबीटीवरील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: कृषी यंत्रीकरण योजनेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर

राज्यात महाडीबीटी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेसाठी 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास 23 जानेवारी 2026 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात कृषी यंत्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात येऊन त्यांनी यंत्र–अवजारे खरेदी केली असून, बिल-चलान अपलोड करून … Read more

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत मोठा बदल; नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास शासनाची मंजुरी

राज्यातील भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान देणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आज 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली असून, … Read more