विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (VMDDP) टप्पा–2 : अर्जांची मंजुरी प्रक्रिया सुरु – राज्यातील शेतकऱ्यांत उत्साह

राज्यातील दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा–2 अंतर्गत अर्जांची मंजुरी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी व हितग्राही यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 192 तालुके आणि 24,657 गावांमध्ये ही महत्त्वाची योजना राबवली जात आहे.

या योजनेबाबतची संपूर्ण माहिती, अर्जाची स्थिती तसेच लाभार्थी यादी पाहण्यासाठी अधिकृत vmdp.com या पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोर्टलवर अर्ज भरलेल्या नागरिकांना “अर्जाचा मागोवा घ्या” या पर्यायाद्वारे आपला वैयक्तिक अर्ज तपासता येतो. मोबाईल नंबर किंवा PMDP-डॅश स्वरूपातील अर्ज आयडी वापरून अर्जाची सद्यस्थिती पाहणे शक्य आहे.

पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार –

  • एकूण प्राप्त अर्ज : 7803
  • मंजूर : 233
  • प्रलंबित : 7145
  • नाकारलेले : 385
  • निवड झालेले : 40

जिल्हानिहाय स्थिती पाहण्याची तसेच कोणते अर्ज Approved, Pending, Selected वा Rejected आहेत याची सविस्तर माहितीही पोर्टलवर उपलब्ध आहे. मंजूर अर्जांमध्ये लाभार्थ्याचे नाव, अर्जाचा क्रमांक, अर्जाची तारीख यांसह इतर माहितीही स्पष्ट दिसते.

दुग्धव्यवसाय विकासासाठी मोठ्या निधीसह नऊ घटकांवर ही योजना राबवली जात असल्याने राज्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी ही महत्त्वपूर्ण संधी मानली जात आहे. अद्यापही इच्छुक शेतकऱ्यांना पोर्टलवरुन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्यातील दुग्ध क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment