शेतकऱ्यांसाठी अनुदानित दुग्ध विकास योजना – त्वरित अर्ज करा
विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. 192 तालुके व 24,657 गावांतील शेतकऱ्यांना गाई-म्हशी वाटप (50% अनुदान), भ्रूण प्रत्यारोपण (75% अनुदान), प्रजनन पूरक खाद्य (25% अनुदान), फॅट वाढवणारे पूरक, मुरघास, तसेच ४,000 रुपये 100% अनुदानावर बहुवार्षिक चारा लागवड अशा योजना उपलब्ध आहेत. अर्ज PMDDP.com पोर्टलवर शेतकरी नोंदणी करून करायचे आहेत.
19 जिल्ह्यांची यादी :
मराठवाडा – 8 जिल्हे
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
- जालना
- बीड
- लातूर
- धाराशिव (उस्मानाबाद)
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
विदर्भ – 11 जिल्हे
- अकोला
- अमरावती
- बुलढाणा
- वाशीम
- यवतमाळ
- नागपूर
- वर्धा
- भंडारा
- गोंदिया
- चंद्रपूर
- गडचिरोली