राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय बरणे यांनी जाहीर केले आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, कागदपत्रे अपलोड करणे, पडताळणी आणि अनुदान वितरण सर्व काही महाडीबीटीवर करण्यात येईल.
आतापर्यंतची समस्या
2017 पासून राबवली जात असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना विमा कंपन्यांमार्फत लाभ मिळवणे कठीण जात होते.
ऑफलाईन अर्ज, कागदपत्रांची कमतरता, वारंवार त्रुटी, कार्यालयीन दिरंगाई यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहत होते आणि अनेकांना लाभच मिळत नव्हता.
नवीन निर्णय का महत्त्वाचा?
- अर्ज पूर्णतः ऑनलाइन
- कागदपत्रे अपलोड करण्याची सोय
- अनुदान थेट महाडीबीटीद्वारे वितरण
- प्रक्रियेतील त्रुटी कमी होणार
- वारसांना अनुदान मिळवणे सुलभ
योजनेत कोणते लाभ मिळतात?
या योजनेत शेतकऱ्याचा खालील प्रकारे अपघात झाल्यास सानुग्रह अनुदान दिले जाते—
- अपघाती मृत्यू
- सर्पदंशामुळे मृत्यू
- दोन्ही हात/पाय निकामी होणे
- दृष्टी गमावणे
- इतर गंभीर अपंगत्व
ऑफलाईन प्रक्रिया हटवून आता हा संपूर्ण लाभ थेट शासनामार्फत महाडीबीटीवरून मिळणार आहे.
कधी सुरू होणार?
लवकरच महाडीबीटी पोर्टलवर या योजनेचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यानंतर अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील, प्रक्रिया कशी असेल, याबद्दल शासनाच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या जातील.