शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, आयातबाबतच्या अफवांनी वाढली चिंता
राज्यात अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले असतानाही शासनाने सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता वाढवून नवीन मर्यादा जाहीर केल्या. यामुळे हमीभावाने (₹5328) विक्री वाढली असून बाजारभावातही तेजी दिसतेय. मात्र उत्पादकता वाढवल्यामुळे पीक विम्याच्या नुकसान भरपाईवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच सोयाबीन आयातीच्या अफवा पसरवून बाजारभाव घसरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक जिल्ह्यांसाठी वाढीव उत्पादकता निश्चित केली असून शेतकरी सावधगिरीनेच विक्री करावी, असा सल्ला दिला जात आहे.