जिल्ह्यातील पहिला ठराव शिरपूर ग्राम पंचायतीने केला मंजूर
बुलडाणा (गावोगावी महाराष्ट्र न्युज )गावातील शेतजमीन बाहेरच्या व्यक्तीला विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हयात पहिला ठराव शिरपूर ग्राम पंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे अवैध धन संपदेत गुंतवणूक करणाऱ्यांचा चांगलाच चाप दिवाळीच्या पर्वावर बसला आहे. त्यामुळे धनाढ्यांना इतरत्र जमिन खरेदी करणे आता कठीण होणार आहे.
गावातील जमीन गावातच राहणार आहे. हाच उद्देश ग्राम पंचायतीचा आहे. शिरपूर येथे महात्मा गांधी जयंतीदिनी दि. २
गावाची जमीन गावातच राहिली तर चांगले होईल
खरंतर हा निर्णय फार जुनाच शासनाने काढलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामस्थाच्या माध्यमातून ग्राम पंचायतने ठराव घेऊन केले आहे. गावाची जमीन गावातच राहिली तर चांगले होईल. बाहेरचे येऊन येथे गुंतवणुकीसाठी शेती घेतात. त्यामुळे या बाबीकडे लक्ष वेधण्याचे काम केले. स. ज. सुसर, सरपंच शिरपूर
ऑक्टोंबर रोजी ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत मौजे (शिरपूर ता.जि. बुलडाणा) गावातील शेतजमीन गावाबाहेरच्या व्यक्तीला विकता येणार नाही.
शिरपूर गावच्या बाहेरच्या व्यक्तीला ती खरेदी करता येणार नाही, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला आहे. हा ठराव
ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडल्याने इतर ग्रामपंचायती काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
दलाल शेतकऱ्याच्या जमिनी चढ्या भावाने खरेदी विक्री-करीत आहेत. सध्या जमीन खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याचे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
