शेतकऱ्यांची ई-KYC प्रक्रिया सुरू – VK नंबर कसा मिळवायचा आणि अनुदान कसे मिळणार?

अनुदान व नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ई-KYC अनिवार्य

ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान किंवा नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यांनी आपली ई-KYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे Farmer ID किंवा VK नंबर नसल्यामुळे पेमेंट अडले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी प्रथम VK नंबर तलाठी कार्यालय, माही सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयातून घ्यावा.

ई-KYC प्रक्रिया कशी केली जाते?

सेवा केंद्रातून महा ऑनलाइन पोर्टलवर ई-KYC केली जाते.
शेतकऱ्याची सर्व माहिती—आधार क्रमांक, बँक खाते, IFSC कोड, क्षेत्रफळ आणि मिळणारी रक्कम—योग्य असल्यास OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे ई-KYC पूर्ण होते. माहिती चुकीची असल्यास “E-KYC Not Possible” निवडून तहसील कार्यालयात दुरुस्ती करावी.

VK नंबरद्वारे KYC आणि पेमेंट स्टेटस कसे तपासावे?

शेतकरी आपला KYC स्टेटस व पेमेंट स्टेटस VK नंबरद्वारे स्वतःही ऑनलाइन तपासू शकतात.

Leave a Comment