महाराष्ट्रात राष्ट्रीय खाद्य तेल अभियान 2025 अंतर्गत १००% अनुदानावर भुईमूग बियाण्याचे वितरण!

🔹 कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ?

भुईमूग उन्हाळी हंगामासाठी राज्यातील खालील ८ जिल्हे निवडले आहेत:

  1. कोल्हापूर
  2. सांगली
  3. सातारा
  4. नाशिक
  5. धुळे
  6. पुणे
  7. अहमदनगर (अहिल्यानगर)
  8. छत्रपती संभाजीनगर

या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बियाणे मिळणार आहे.


🔹 अर्ज कुठे करायचा?

शेतकऱ्यांनी महाडीबीटी Farmer Scheme Portal वर “बियाणे व कीडनाशके” या घटकाखाली अर्ज करायचा आहे.


🔹 किती बियाणे मिळणार?

  • जास्तीत जास्त मर्यादा: प्रति शेतकरी १ हेक्टरी (१५० किलो)
  • कमी मर्यादा: २० गुंठे (३० किलो)
  • १ एकर साठी: साधारण ६० किलो बियाणे
  • उपलब्धतेनुसार २० किलो३० किलो पॅक देण्यात येतील. पॅक उपलब्धतेनुसार समायोजन केले जाईल.

🔹 100% अनुदान म्हणजे काय?

भुईमूग बियाण्याचा दर ₹114 प्रति किलो निश्चित आहे.
शेतकऱ्यांना हा पूर्ण खर्च सरकारकडून अनुदान म्हणून दिला जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना बियाण्यासाठी एक पैसाही भरावा लागणार नाही.


🔹 बियाण्याचा पुरवठा

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यांच्या अर्जानुसार व मर्यादेनुसार बियाणे देण्यात येणार आहेत.

Leave a Comment