नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-Kisan) अंतर्गत मिळणाऱ्या 22व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट मिळाले आहे. प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना लवकरच 2000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सायंकाळी सुमारे 5 वाजता पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाऊ शकतो. हा कार्यक्रम Assam येथे आयोजित करण्यात येण्याची माहिती समोर आली आहे.
सरकारकडून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातील.
दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता देखील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. पीएम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सरकारकडून या दोन्ही योजनांबाबत कोणतेही नवीन अपडेट किंवा अधिकृत घोषणा झाल्यास त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.