आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देशभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. कोटींहून अधिक लाभार्थ्यांना २००० रुपये थेट खात्यात पाठवले जात आहेत.
- दुपारी 2 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाला
- आता संध्याकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत
- ज्यांचे मोबाईल नंबर अपडेट आहेत त्यांना SMSने माहिती येत आहे
हप्ता आलाय की नाही हे कसे तपासायचे?
सध्या:
- PM Kisan वेबसाइट आणि ॲप्लिकेशन दोन्हीवर लोड आहे, त्यामुळे स्टेटस दिसत नाही
- PFMS वर DBT Tracker सुद्धा काढून टाकला आहे
🔹 त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते थेट बँकिंग ॲप/पासबुकवरुन तपासा
उद्या सकाळपर्यंत वितरण सुरू राहणार
- सर्वांना एकाच वेळी हप्ता येत नाही
- आणखी बरेच शेतकरी रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पात्रतेनुसार रक्कम मिळवतील
ज्यांना पैसे येणार नाहीत ते का?
- अपात्रता
- कागदपत्रांची समस्या
- DBT खाते चुकीचे
- आधार किंवा KYC समस्या
ही माहिती PM Kisan ॲप/वेबसाइट सुरू झाल्यावर दिसू लागेल.