केंद्र सरकारने पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल मंजूर केले आहेत. 18 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाने नवे ट्रिगर लागू करण्यास परवानगी दिली. यात वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, अतिवृष्टीमुळे पाणी साचून होणारे नुकसान आणि विशेषतः भात पिकाच्या नुकसानीचाही समावेश केला जाणार आहे. शेतकऱ्यांना 72 तासांत तक्रार नोंदवता येणार असून विमा मिळवणे सोपे होणार आहे. खरीप 2026 पासून ही सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभर लागू होणार आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.