शेतकरी, नागरिक, दुकानदार, विद्यार्थी सर्वांसाठी सोपी सुविधा
शासनाच्या ग्रीवन्स पोर्टलद्वारे नागरिकांना विविध विभागांविरोधात ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर जिल्हा, तालुका, विभाग आणि तक्रारीचे स्वरूप निवडून तक्रार करता येते. अतिवृष्टी अनुदान, रेशन, मनरेगा, महसूल, कृषी, सहकार विभागातील गैरव्यवहारांसह कोणत्याही प्रशासनिक तक्रारीचे पुरावे अपलोड करून सबमिट करता येतात. तक्रार क्रमांकाद्वारे पाठपुरावा देखील करता येतो. या प्रक्रियेमुळे नागरिकांना शासन स्तरावर थेट दाद मागण्याचा सोपा डिजिटल मार्ग उपलब्ध झाला आहे.