मेहकर : -( गावोगावी महाराष्ट्र न्यूज ) जिल्ह्यात वाढत्या अवैध रेतीउद्योगावर अंकुश ठेवण्यासाठी मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी पोलिसांनी दोन ठिकाणी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई मेहकर-चिखली रोडवरील उसरण फाटा परिसरात करण्यात आली. येथे रेतीची अवैध वाहतूक करणारा टिपर वाहन पोलिसांनी पकडला. तपासात २८ हजार रुपये किंमतीची ४ ब्रास रेती, २० लाख रुपये किंमतीचा टिप्पर, ८ लाखांचा बोलेरो जीप आणि मोबाईल असा एकूण २८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी शंकर गजानन खरात (रा. कळंबेश्वर, वय २४) आणि वैभव हिरालाल ढोणे (रा. सारशिव, वय ३१) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
