“माझी लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता अखेर मंजूर – 263 कोटींच्या निधीला हिरवा कंदील, लाखो महिलांना दिलासा!”

राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय सुखद आणि दिलासादायक अपडेट समोर आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (माझी लाडकी वाहिण) योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा थकलेला हप्ता वितरणासाठी राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे.

आज ८ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिकृत जीआर जारी करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार, एससी प्रवर्गासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, एकूण ₹263 कोटी 45 लाखांचा निधी हप्ता वितरणासाठी मुक्त करण्यात येणार आहे. सर्वसाधारण, एससी आणि एसटी असे तिन्ही प्रवर्ग यामध्ये लाभार्थी असतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे हप्ता लांबणीवर पडला होता. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये हप्ता कधी मिळणार, अजून प्रतीक्षा करावी लागणार का अशा प्रश्नांची मोठी चर्चा होती.

मात्र आता, शासनाकडून मंजुरी मिळाल्यामुळे हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच महिला व बालविकास मंत्री हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर करतील.

उपलब्ध निधी थेट DBT द्वारे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तारखेवरील पुढील अपडेट मिळताच ती माहिती देखील तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Comment