मनुबाई गावात आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 संदर्भात चर्चा – पुष्पाताई गायकवाड यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात

निवडणुका २०२५

मनुबाई ( जि.बुलढाणा ):आगामी जिल्हा परिषद निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर मनुबाई गावात राजकीय चर्चा रंगत चालल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत गावात चर्चा करण्यात आली.या बैठकीत पुष्पाताईंचे पती श्री. संतोषराव गायकवाड यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मनुबाई गावचे प्रथम नागरिक श्री. संदीप भाऊ वायाळ, माननीय राजूभाऊ सवडतकर, तसेच उभाडा गटाचे माननीय गजूभाऊ वायाळ हे उपस्थित होते.तसेच माननीय आप्पासाहेब डोंगरदिवे आणि ग्रामस्थ उपस्थित असताना आगामी निवडणुकीसाठी तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि “पुढील निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत” असा निर्धार व्यक्त केला.या चर्चेमुळे मनुबाई परिसरात राजकीय तापमान वाढले असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *