मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC ला मोठी मुदतवाढ – 31 डिसेंबर 2025 पर्यंत करा KYC

KYC ची नवी अंतिम तारीख

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेला मोठी दिलासादायक मुदतवाढ दिली आहे. पूर्वी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख होती, परंतु तांत्रिक बिघाड, ओटीपी न येणे, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक लाभार्थिनींची KYC प्रलंबित राहिली. त्यामुळे शासनाने KYC ची अंतिम तारीख वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे.

विशेष परिस्थितीत KYC

ज्या महिला लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेल्या आहेत, त्यांनी फक्त आधार OTP वापरून KYC करावी आणि संबंधित पुरावे महिला व बालविकास कार्यालयात जमा करावेत. ही मुदतवाढ सर्व पात्र लाभार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Comment