महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय – ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (MML) निर्मिती सुरू
“महाराष्ट्र मेड लिकर ब्रँड” महाराष्ट्र शासनाने राज्यातील महसूल वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत परदेशी दारू कंपन्यांमुळे राज्यातून मोठा पैसा बाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने, आता शासन स्वतःचा विशेष दारू ब्रँड सुरू करणार आहे. हा ब्रँड असेल – महाराष्ट्र मेड लिकर (MML), जो फक्त राज्यापुरता मर्यादित असेल.
निर्णयामागील पार्श्वभूमी
सध्या महाराष्ट्रावर तब्बल ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. “लाडकी बहीण”सारख्या योजनांसाठी मोठा आर्थिक भार उचलावा लागत आहे. “महाराष्ट्र मेड लिकर ब्रँड” महसूल वाढवण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने धान्यावर आधारित नवीन प्रकारच्या मध्य निर्मितीला परवानगी दिली आहे. यामुळे सरकारला अंदाजे ३,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र मेड लिकरची वैशिष्ट्ये
- धान्यावर आधारित उत्पादन – MML हा पूर्णपणे धान्यावर आधारित असेल.
- किंमत – 180 मिली साठी किमान ₹148 किंमत ठरवली आहे.
- शक्ती – 42.8% पर्यंत अल्कोहोल प्रमाण (25 UP पर्यंत मर्यादित).
- स्थानिक ब्रँड – केवळ महाराष्ट्रातच उत्पादन आणि विक्री.
- विदेशी गुंतवणुकीवर बंदी – MML उत्पादक कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणूक नसावी.
- स्थानिक मालकी – किमान 25% भागभांडवल महाराष्ट्रातील कायम रहिवाशांकडे असणे आवश्यक.
याआधी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या आर्थिक निर्णयांविषयी अधिक वाचा – महाराष्ट्र बजेट 2025 मधील ठळक मुद्दे
उद्योगांना मिळणारी चालना
सध्या राज्यातील 70 पैकी 22 मध्य निर्मिती उद्योग बंद आहेत. या निर्णयामुळे बंद पडलेल्या व कमी क्षमतेने चालणाऱ्या युनिट्सना नवा उर्जेचा स्त्रोत मिळणार आहे. 2007 मध्येही अशाच प्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तो फारसा यशस्वी ठरला नव्हता.
वाद आणि प्रतिक्रिया
एका बाजूला महिला संघटना व समाजातील काही गट दारूबंदीची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे सरकार महसूल वाढवण्यासाठी दारू निर्मितीचा मार्ग निवडत आहे. यावरून समाजात मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शासनाचे म्हणणे आहे की, यामुळे स्थानिक उद्योग, रोजगार आणि महसूल तिन्ही वाढतील.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट पहा.
भारतातील मद्य उद्योगाबाबत माहिती भारतीय मद्य संघटना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
निष्कर्ष:
महाराष्ट्र मेड लिकर हा फक्त आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर औद्योगिक पुनरुज्जीवनाचाही एक प्रयत्न आहे. मात्र, सामाजिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीच्या चळवळीवर याचा परिणाम काय होईल, हे येणारा काळच ठरवेल.