बुलडाणा (गावोगावी महाराष्ट्र न्यूज)दोन दुचाकींची समोरासमोर धडक घेवून झालेल्या भीषण अपघातात लाखनवाडा येथील दोघे जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील लाखनवाडा आंबेटाकळी रोडवर १२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
लाखनवाडा येथील योगेश ज्ञानेश्वर जावळे (वय २५), गणेश श्रीराम पांढरे (वय ३५) असे ठार झालेल्या दोघांची नाचे आहेत. यातील योगेश जावळे हा त्याच्या सासारवाडी चरून महान पिंजर येथून रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान लाखनवाडा येथे आपल्या दुचाकीने येत होता. तर गणेश पांढरे हा कामानिमित्ताने लाखनवाडा येथून आंबटाकळी येथे दुचाकीने जात होता. यावेळी दोघांच्या दुचाकीने नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकी यांची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात यातील दोघेही जागीच ठार झाले. यातील दोघेही विवाहित असून योगेश जावळे याला एक वर्षांची लहान मुलगी आहे. तर गणेश पांढरे याला सुद्धा एक मुलगा एक मुलगी आहे.
