मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या योजनेतून पुढचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारी वेबसाइटवर केवायसीचा पर्याय दिसू लागला असून, लवकरच ऑनलाईन केवायसी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या केवळ पर्याय दिसतोय पण क्लिक करताच ‘एरर’ दाखवतो – याचा अर्थ प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. मात्र, आता केवायसी केल्याशिवाय योजनेचे पुढील पैसे खात्यावर जमा होणार नाहीत, ही बाब शंभर टक्के निश्चित आहे. त्यामुळे लाखो लाभार्थ्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, ‘नारीशक्ती’ अॅपमधून फॉर्म भरलेले लाभार्थी देखील याच वेबसाइटवरून केवायसी करू शकणार आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी वेळेत केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा पुढील हप्ता अडकू शकतो.
यासंदर्भात लवकरच मोबाईलमधून ई-केवायसी कशी करावी, याचा व्हिडिओ देखील येणार असून, तो सर्वात आधी पाहण्यासाठी अधिकृत चॅनलला फॉलो करणे गरजेचे आहे.
वेळ हातातून जाऊ देऊ नका – आता तयारीत लागा!
ही बातमी तुमच्या मैत्रिणींना, नातेवाइकांना शेअर करा – हप्ता बंद झाला तर उशीर होईल!