किनगाव राजा ( गावोगावी महाराष्ट्र न्युज )किनगाव राजा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर पंचायत समिती गणाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर झाले आहे. या निर्णयामुळे सर्व समाजघटकांतील उमेदवारांना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरता येणार असून, पंचायत समिती पातळीवर महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
आज, दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या आरक्षण प्रक्रियेत किनगावराजा गण
महिलांसाठी राखीव आरक्षण ठरल्याने महिलावर्गात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक महिलांकडून ग्रामपातळीवरील जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात होणार असून, आता महिला निर्णायक ठरणार आहेत. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत होत असून, महिलांना राजकारणात पुढे येण्यासाठी मिळालेली ही संधी स्वागतार्ह असल्याची भावना महिला व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीत किनगावराजा गट आणि गणात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
