11813 शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पहिला हप्ता मिळणार
खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त विहिरींचे पंचनामे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 11813 शेतकऱ्यांना प्रत्येकी 15,000 रुपये असा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. या टप्प्यासाठी राज्याने 18 कोटी 56 लाख निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांतील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.