गौतम गंभीरची कमाई ऐकून थक्क व्हाल! भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असून घेतो तब्बल एवढे कोटी वार्षिक पगार

क्रिडा विश्व

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.खेळाडू म्हणून देशासाठी अनेक सामने जिंकणारा गंभीर आज मैदानाबाहेरून टीम इंडियाला दिशा देतो. पण तुम्हाला माहिती आहे का? गौतम गंभीरची कमाई ऐकून कुणालाही थक्क व्हावे असेच आहे. क्रिकेटप्रती समर्पणासोबतच तो आज करोडोंचा मालक असून त्याची संपत्ती तब्बल ₹265 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. बीसीसीआयकडून गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून दरवर्षी ₹14 कोटी रुपयांचा पगार मिळतो. एवढेच नव्हे तर त्याला अनेक विशेष सुविधा, प्रवासभत्ता आणि अधिकृत निवासाची सोय देखील दिली जाते. यामुळे तो सध्या भारतच नव्हे तर जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या क्रिकेट प्रशिक्षकांपैकी एक ठरला आहे.

गंभीर मैदानावर जरी गंभीर स्वभावाचा वाटत असला तरी त्याची जीवनशैली अतिशय आलिशान आहे. दिल्लीतील राजेंद्र नगर परिसरात त्याचे एक सुंदर व आलिशान घर आहे. या घराची किंमत तब्बल ₹30 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. या घरात तो आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहतो. काही दिवसांपूर्वीच सामना संपल्यानंतर त्याच्या मुलींसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये गंभीर थोडा चिडलेला दिसत असला तरी, त्याच्या कुटुंबातील जवळीक आणि संवादाने चाहत्यांना भावूक केलं.

फक्त बीसीसीआयचा पगारच नाही, तर गौतम गंभीर हा अनेक मोठ्या ब्रँड्सचा चेहरा आहे. तो सध्या Reebok, MRF, Pinnacle Speciality Vehicles, Radcliffe Labs यांसारख्या कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या जाहिराती आणि करारांमधूनही तो दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

याशिवाय गौतम गंभीरचे स्वतःचे काही व्यवसाय आहेत, ज्यातून त्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्याच्या गॅरेजमध्ये Audi Q5, BMW 530D, Mahindra Bolero Stinger, Toyota Corolla आणि Maruti SX4 यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. ही सर्व वाहने त्याच्या यशाची साक्ष देतात.

क्रिकेटमधील कारकीर्दीनंतर कोच म्हणून त्याने घेतलेली झेप सर्वांनाच प्रेरणादायक आहे. प्रशिक्षक पदाच्या काळात भारताने अनेक सामने जिंकले आहेत आणि खेळाडूंसाठी गंभीर नेहमीच मार्गदर्शक म्हणून उभा राहिला आहे. त्याची रणनीती, टीम मॅनेजमेंटची शैली आणि जिंकण्याची वृत्ती यामुळे तो चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या मनात विशेष स्थान मिळवतो.

गौतम गंभीरची कमाई केवळ पैशांपुरती मर्यादित नाही. समाजसेवेमध्येही तो सक्रिय आहे. दिल्लीतील गरजू मुलांसाठी शिक्षण आणि आहार पुरवणाऱ्या त्याच्या ट्रस्टमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळाले आहे. क्रिकेट, समाजकार्य आणि कौटुंबिक आयुष्य या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखणारा गंभीर आज भारतातील प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे .

त्याचं व्यक्तिमत्त्व कठोर, पण उद्दिष्ट स्पष्ट आहे — टीम इंडियाला सर्वोच्च शिखरावर नेणे. बीसीसीआयकडून मिळणारा पगार असो किंवा स्वतःच्या मेहनतीने कमावलेली संपत्ती, गौतम गंभीरने हे सर्व आपल्या प्रतिभेच्या जोरावर मिळवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *