शिवसेना प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या ; भाजपवर प्रपोगंडाचा आरोप
सदर नेत्याने ठामपणे सांगितले की, ते काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असून गेली २५ ते ३० वर्षे त्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून कार्य केले आहे. “माझी राजकीय ओळख ही तत्त्वांवर उभी आहे, अफवांवर नाही,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, विरोधकांची प्रतिमा डागाळण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवणे ही नवीन बाब नाही. काही वर्षांपूर्वीही चिखली येथील भाजप कार्यालयातून त्यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवल्याचा त्यांनी आरोप केला. विकासाच्या मुद्द्यांवर उत्तर देता येत नसल्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेवर हल्ले करण्याची सवय भाजपला लागली असल्याचे ते म्हणाले.
“राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की सत्याला वाकवून खोटं पसरवणं हाच त्यांचा अजेंडा बनला आहे. मात्र जनतेला सत्य माहित आहे आणि अशा अफवांमुळे जनतेचा विश्वास ढळणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ते आजही काँग्रेस पक्षासोबत असून भविष्यातही पक्षाच्या विचारधारेसाठीच काम करत राहणार आहेत. “अफवांवर विश्वास ठेवू नका,