चिखली (प्रतिनिधी) : चिखली शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे ‘शिंदे हॉस्पिटल’ आता नव्या आणि आधुनिक इमारतीत स्थलांतरित झाले असून या नव्या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा आज, सोमवार (१६ मार्च २०२६) रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधा आणि अद्ययावत उपचार पद्धतींनी सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास प.पू. गुरुवर्य १००८ वेदांताचार्य आचार्य स्वामी श्री हरिचैतन्यनंद सरस्वतीजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. पि. डब्ल्यू. सांबरे (M.D. Obs-Gynac, PhD) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्रीमती सुनीता ताई तेजराव शिंदे, सौ. शीलाताई धोंडीराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अभिमन्यु तेजराव शिंदे (M.B.B.S., MS Obs-Gynac, Fertility Specialist, Gynac Endoscopic Surgeon) व डॉ. सविता अभिमन्यु शिंदे (M.B.B.S., D.N.B. Pediatrics, L.A.F. Neonatology) हे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करणार आहेत.
या सोहळ्यास विनीत म्हणून श्रीमती गयाबाई देवराव शिंदे, शोभा रामेश्वर नरवाडे, शीलाताई धोंडीराम पाटील, मिनाताई राजेंद्र शिंदे, डॉ. प्रतिभा दिपक भगत, डॉ. दिपक दत्तु भगत, रामेश्वर ज्ञानदेव नरवाडे, धोंडीराम मारुती पाटील, राजेंद्र देवराव शिंदे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम बी.डी.सी.सी. बँकेच्या पाठीमागे, खामगाव चौफुली जवळ, चिखली येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.