घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

70 कोटी रुपयांचा निधी मंजूर – अडकलेले हप्ते लवकरच खात्यात जमा होणार राज्यातील घरकुल योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य शासन यांनी आज 24 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी करत घरकुल योजनेसाठी 70 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. हा निधी केंद्र पुरस्कृत … Read more

प्रलंबित पीक विमा अनुदान वितरणाला गती – शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील शेतकरी 2025 च्या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असताना, सरकारकडून जुन्या प्रलंबित पीक विमा प्रकरणांवर मार्ग काढण्यास गती देण्यात आली आहे. याआधी 2020 सालातील धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्यासाठी तब्बल 134 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर इतर अनेक प्रलंबित पीक विमा निधी वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने राज्य शासनांना … Read more

महिला बचत गटांसाठी 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना

वाशिम : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना जास्तीत जास्त 3 लाख 15 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. याच योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात अर्ज मागविण्यात आले … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यात नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आला आहे. पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना आता थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने राबवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत बँकांमार्फत लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून केसीसी धारक शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज सवलत दिली जाते, तर … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात राशनऐवजी अनुदान जमा होण्यास सुरुवात…?

मराठवाडा व विदर्भातील 14 जिल्ह्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले शेतकरी रेशनऐवजी देण्यात येणारे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रति रेशन कार्ड, प्रति लाभार्थी, प्रति महिना 170 रुपये … Read more

या जिल्ह्यांमध्ये15 जानेवारीपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याचे संकेत

प्रतिनिधी | शेती अपडेट राज्यातील खरीप हंगामासाठीची अंतिम पैसेवारी एकामागून एक जाहीर होत असून अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्रता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 🔹 बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून … Read more

किसान क्रेडीट कार्ड वाढीची घोषणा की प्रत्यक्षात अपुरा लाभ? शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

मुंबई/नवी दिल्ली:किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेची कर्जमर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार असल्याच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्समधून केसीसीची मर्यादा वाढवण्यात येणार, तसेच उसासाठी दिले जाणारे पीक कर्ज दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आल्याच्या बातम्या झळकत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या वाढीव मर्यादांचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतोय, यावर मात्र गंभीर … Read more

अवघ्या २५०० रुपयात सोलर; काय आहे नेमकी योजना

मुंबई | प्रतिनिधीराज्यात छतावरील सौरऊर्जा (Rooftop Solar) प्रकल्पांना चालना देण्यासाठी महावितरण (महाडिस्कॉम) मार्फत ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर अनुदान योजना’ राबवली जात असून तीच योजना ‘स्मार्ट सोलर’ या नावाने ओळखली जात आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडून पूरक अनुदान दिले जात आहे. सध्या या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता तपासणी तसेच … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हालचालींना वेग; सहकारी बँकांकडून माहिती संकलन सुरू

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतची घोषणा जवळपास निश्चित मानली जात असताना, त्या दृष्टीने शासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे. अद्याप कर्जमाफीबाबत अधिकृत निकष जाहीर झाले नसले तरी सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, कोणत्या वर्षापर्यंतच्या थकबाकीचा समावेश असेल, चालू कर्जधारकांचा समावेश होणार की फक्त थकीत कर्जदारांनाच … Read more

सुधारित पीक विमा योजनेसाठी प्रशासकीय खर्चाला 31.46 कोटींची मंजुरी; कधी मिळणार पिक विमा..?

मुंबई | दि. 19 डिसेंबर 2025 राज्यात राबवण्यात येत असलेल्या सुधारित पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाने प्रशासकीय व कार्यालयीन खर्चासाठी 31 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये “पीक विमा प्रत्यक्षात कधी मिळणार?” हा प्रश्न उपस्थित झाला असून, सध्या सुरू असलेल्या प्रक्रियांवरून जानेवारीअखेर ते फेब्रुवारी 2026 दरम्यान पीक विमा वितरित होण्याची … Read more