बुलढाणा :-(गावोगावी महाराष्ट्र न्युज ) शहर आणि तालुक्यात वाढत्या अवैध दारू विक्री व जुगार प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी शनिवारी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहर व ग्रामीण भागात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १२ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि जुगार साहित्य जप्त केले आहे. शहर पोलिसांनी दहा ठिकाणी तर ग्रामीण पोलिसांनी दोन गावांमध्ये छापे मारून कारवाई केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू विक्री आणि जुगाराचे प्रमाण वाढले असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कारवाई चे स्वागत केले आहे.
