महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू

बारामती, प्रतिनिधी — मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या एका खासगी विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला सकाळी साधारण ८:४५ ते ९:०० या वेळेत बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानाला अचानक आग लागली आणि ते कोसळले.

या अपघातात विमानातील अजित पवारांसह सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त पीटीआय (PTI) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिले आहे. मृतांमध्ये दोन वैमानिकांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि जाहीर सभांसाठी बारामतीकडे येत होते. अपघातानंतर विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली. अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, डीजीसीएकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अधिकृत अहवालानंतरच

Leave a Comment