अन्नपूर्णा योजनेच्या गॅस सबसिडीसाठी राज्य सरकारची मोठी मंजुरी

SC-ST महिलांच्या गॅस अनुदानाला चालना

राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडरच्या प्रलंबित सबसिडीसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 17 नोव्हेंबर 2025 च्या जीआरनुसार SC-ST लाभार्थ्यांसाठी एकूण 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी SC महिलांसाठी 30 कोटी रुपये तातडीने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडे असलेले प्रलंबित देयक भरून काढल्यानंतर 2025-26 आर्थिक वर्षातील पात्र महिलांना अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे योजना बंद झाली की नाही, निधी मिळणार का अशा शंका दूर झाल्या आहेत.

Leave a Comment