1800 पात्र मंडळांना साडेतीन कोटी रुपयांचा निधी वितरित
राज्य सरकारने भजनी मंडळांसाठी मोठा दिलासा देत 25,000 रुपयांच्या एकवेळच्या अनुदानासाठी निधी मंजूर केला आहे. राज्यातील पात्र 1800 भजनी मंडळांना एकूण साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी काढलेल्या जीआरनुसार अर्ज मागवले होते आणि 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होती. 24 नोव्हेंबर 2025 रोजी नव्या जीआरद्वारे वाद्य खरेदीसाठी भांडवली अनुदानास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. पात्र मंडळांना लवकरच रक्कम जमा होणार आहे.