शेतकऱ्यांसाठी 80% अनुदानात ड्रोन; मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना सुरू

5,000 ड्रोन वाटपासाठी 400 कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना’ सुरू करून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेत या घटकाचा समावेश करण्यात आला असून 5,000 ड्रोन वितरित केले जाणार आहेत. यासाठी 400 कोटींचा निधी मंजूर आहे. शेतकरी बचत गट, एफपीओ, शेतकरी उत्पादक संस्था आणि ग्रामीण युवा मदत गट यांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज महाडीबीटी पोर्टलवरील गटाच्या लॉगिनद्वारे करावा लागणार आहे. योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर राबवली जाणार असून आचारसंहिता संपल्यानंतर अर्जांची प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment