पीएम किसान 21वा हप्ता — आजपासून वितरण सुरू! (सोप्या भाषेत सारांश)

आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देशभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. कोटींहून अधिक लाभार्थ्यांना २००० रुपये थेट खात्यात पाठवले जात आहेत.

  • दुपारी 2 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाला
  • आता संध्याकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत
  • ज्यांचे मोबाईल नंबर अपडेट आहेत त्यांना SMSने माहिती येत आहे

हप्ता आलाय की नाही हे कसे तपासायचे?

सध्या:

  • PM Kisan वेबसाइट आणि ॲप्लिकेशन दोन्हीवर लोड आहे, त्यामुळे स्टेटस दिसत नाही
  • PFMS वर DBT Tracker सुद्धा काढून टाकला आहे

🔹 त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते थेट बँकिंग ॲप/पासबुकवरुन तपासा

उद्या सकाळपर्यंत वितरण सुरू राहणार

  • सर्वांना एकाच वेळी हप्ता येत नाही
  • आणखी बरेच शेतकरी रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पात्रतेनुसार रक्कम मिळवतील

ज्यांना पैसे येणार नाहीत ते का?

  • अपात्रता
  • कागदपत्रांची समस्या
  • DBT खाते चुकीचे
  • आधार किंवा KYC समस्या

ही माहिती PM Kisan ॲप/वेबसाइट सुरू झाल्यावर दिसू लागेल.

Leave a Comment