अहमदनगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. पण या आनंदाच्या क्षणी सोशल मीडियावरून आलेल्या अश्लील आणि व्यक्तिगत टीकांमुळे महाराज व्यथित झाले आहेत.
इंदुरीकर महाराज म्हणाले,
“माझ्याबद्दल लोक काहीही बोलतात, ते चालतं… पण आता तर लोक माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट करतात! अशा लोकांमुळे मला खोलवर वेदना झाल्या आहेत. मी येत्या दोन दिवसांत मोठा निर्णय घेणार आहे — आणि कदाचित मी आता कीर्तन सोडणार आहे.”
या वक्तव्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर हजारो भक्तांनी महाराजांना कीर्तन सोडू नये, अशी विनंती सुरू केली आहे.
महाराजांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात खूप मोठी चर्चा रंगली आहे.