PM-Kisan 21वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांची दिवाळीपूर्वीची वाट पाहणे वाढले,

शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था सरकारी योजना

देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २१ व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते . यापैकी २ हजार रुपयांचा २१वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल , अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही .

केंद्र सरकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, PM Kisan 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी याबाबत घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येते.

बिहार निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. सध्या बिहारमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे, सरकार हप्ता जारी करेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, आचारसंहिता काळात नवीन योजना जाहीर करता येत नाही, मात्र आधी मंजूर झालेल्या योजनांचा लाभ मात्र शेतकऱ्यांना देऊ शकतो.

दरम्यान, ई-केवायसी (eKYC) पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा २१वा हप्ता मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारने अनेक वेळा जाहीर केले आहे की, पीएम किसान योजनेत लाभ मिळवण्यासाठी आधार व बँक खाते लिंक करणे आणि ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे जर तुमचा PM Kisan 21वा हप्ता थांबला असेल, तर तत्काळ तुमचे eKYC पूर्ण करा आणि खात्याची माहिती तपासा.

या योजनेचा लाभ देशभरातील जवळपास ११ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे या हप्त्याच्या तारखेची घोषणा होताच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *