“भाऊ, आमच्या ताईला उभा करा…विनायक सरनाईक यांना सवना-इसोली सर्कल मधील जनतेची भावनिक हाक!”

निवडणुका २०२५

सवना (गावोगावी महाराष्ट्र न्युज):
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या एका फेसबुक पोस्टने सध्या सवना आणि इसोली सर्कलमध्ये भावनांचा पूर उसळला आहे.
सरनाईक यांनी “इसोली सर्कल, सवना सर्कल की शेलुद पंचायत समिती — कुठून उभं राहायचं?” असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला. त्यावर नागरिकांनी भावनिक प्रतिसाद देत म्हटलं —
“भाऊ, आमच्या सर्कलमधून आमच्या ताईला उभं करा… आम्ही तुमच्या सोबत आहोत!”

काहींनी तर सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं —
“आम्ही वर्गणी गोळा करतो, घरची चटणी-भाकर खात प्रचार करू, पण तुम्हीच लढा!”
ही पोस्ट सध्या गावोगावी व्हायरल होत असून, सवना परिसरात चर्चा रंगली आहे की, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सरनाईक यांच्या पत्नीला सवना सर्कलमधून उमेदवारी देतील की सरनाईक स्वतः इसोलीतून रिंगणात उतरतील?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेली १७-१८ वर्षे सातत्याने लढा देणारे विनायक सरनाईक पुन्हा एकदा जनतेच्या भावनांच्या केंद्रस्थानी आले आहेत. तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपोषणं, रस्ता रोखो, मोर्चे, ठिय्या आंदोलन अशा असंख्य लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
अलीकडेच त्यांनी सवना शेतात पाण्यात बसून शपथ घेतली —
“जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही!”
या घटनेनंतर जनतेमध्ये त्यांच्या लढाऊ वृत्तीबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास वाढला आहे.

गावोगाव लोक म्हणू लागले आहेत —
“विनायकभाऊ, तुम्ही आमच्यासाठी वर्षानुवर्षे लढत आलात, आता आम्ही तुमच्यासाठी लढू!”
अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे.

सवना सर्कलमध्ये सध्या एकच प्रश्न घुमतोय —
“सरनाईक उभे राहणार का?”
कारण लोकांच्या मते —
“शेतकऱ्याचा खरा आवाज, अडचणीत सोबत उभा राहणारा नेता हवा असेल, तर तो फक्त विनायक सरनाईकच!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *