खामगाव (गावोगावी महाराष्ट्र न्युज)करत डीबी पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग असताना शुक्रवारी रात्री शहर त्यांना संशयीतरित्या फिरताना दोन जण आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचे आढळून आले.
येथील शहर पोलिस स्टेशन मधील डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे १० ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना येथील स्टेट बैंक परिसरात दोन संशयित व्यक्ती दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे विशाल सिंग उर्फ विकी प्रमोदसिंग (वय ३४) रा. आग्रा उत्तरप्रदेश व बुद्धेश्वर उमाशंकर करवलं (वय ३५) रा. राजगड जिल्हा मिर्झापुर उत्तरप्रदेश असे सांगितले. पोलिसांनी या दोन संशयितांची चौकशी केली असता त्या उपरोक्त दोघांविरुद्ध संजय नगर बंगलोर पोलिस स्टेशन, जनभारती पोलिस स्टेशन, पोलिस स्टेशन राजेश्वरी नगर बंगलोर,
पोलिस स्टेशन चंद्रा लेआउट मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. परप्रांतीय आरोपी विशाल सिंग व बुद्धेश्वर यांनी मागील २९ सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलिस स्टेशन हद्दीत एम.एच. २७ डीव्ही ३२६३ या क्रमांकाच्या वाहनाची काच फोडून त्यातील एक लाख रुपयांची चोरी केली होती. ही माहिती सुध्दा शहर पोलिसांना चौकशी दरम्यान मिळाली. त्यानंतर शहर पोलिसांनी या बाबतची माहिती परतवाडा पोलिसांना दिली. परतवाडा पोलिस कर्मचारी खामगाव शहर पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर खामगाव पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे ठाणेदार आर. एन. पवार, डीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत मुळीक, पो.ना. सागर भगत, पो. कॉ. रवींद्र कन्नड, गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव व राहुल धारकर यांनी केली.
