बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी

गुन्हे व अपघात (क्राईम) मुख्यपृष्ठ

बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी

बुलढाणा (गावोगावी महाराष्ट्र):
बुलढाणा जिल्ह्यातील सायखेड शिवारात घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात काम करत असलेल्या दोन आदिवासी मजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

जखमींची नावे सलीम हुसेन केदार (वय ३०) आणि जालम हुसेन सुरत्ने (वय ५०) अशी आहेत.
अस्वलाच्या हल्ल्यात सलीम केदार यांच्या डोक्यावर, कमरेवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जालम सुरत्ने यांना किरकोळ जखमा झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
शिवारात अस्वल आढळल्यास नागरिकांनी तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनानेही नागरिकांना इशारा दिला आहे की, जंगलालगतच्या भागात शेतकाम करताना विशेष काळजी घ्यावी. अस्वलाचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *