सरकार झुकले; रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित!

सरसकट विना अट-विना शर्ती कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी (१९ जून) स्थगित करण्यात आले.राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी भेट देत तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी चार दिवसांचा अवधी मागण्यात आला.उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मंत्री महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते शरबत घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.🟢 महत्त्वाचे मुद्दे▪️ पाच दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित▪️ मंत्री गिरीश महाजन यांची आंदोलनस्थळी भेट▪️ सरकारने मागितला चार दिवसांचा अवधी▪️ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आश्वासन▪️ सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर पुन्हा संघर्षाचा इशारा”चार दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर राज्यभर नव्या जोमाने आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.— महेश म्हस्के पाटील | बुलढाणा

Leave a Comment