राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता आज, दिनांक 25 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाद्वारे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरित केला जाणार आहे.
शासनाच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 90 लाख 4241 शेतकरी या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. यामध्ये सुमारे 1808 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर त्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची नोंद तपासणे आवश्यक आहे.
हप्ता मिळाला का कसा तपासाल?
हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकरी खालील पद्धतींनी रक्कम जमा झाली का ते तपासू शकतात:
- बँक पासबुक अपडेट करून
- एटीएम/मिनी स्टेटमेंटद्वारे
- मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग अॅपद्वारे
- CSC केंद्र किंवा बँक मित्राकडे चौकशी करून
शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, शेतीसाठी आवश्यक खर्च भागविण्यास मदत होणार आहे.
मित्रांनो, आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या खात्यात रक्कम जमा झाली का हे नक्की तपासा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.