हरभरा हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू; ई-समृद्धी अ‍ॅपवरून करता येणार अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगाम 2026 साठी हरभरा (चना) हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनाने तब्बल 6.71 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी 1 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हरभरा हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोबाईलवरूनच सोप्या पद्धतीने नोंदणी करता येणार असून यासाठी ई-समृद्धी पोर्टल (e-Samruddhi Application) वापरावे लागणार आहे.

ई-समृद्धी अ‍ॅप कसे वापरावे?

शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये Google Play Store वर जाऊन ई-समृद्धी अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे. अ‍ॅप ओपन केल्यानंतर भाषा (मराठी/हिंदी/इंग्रजी) निवडून मोबाईल नंबर व कॅप्चा टाकून OTP द्वारे लॉगिन करावे लागेल.

तात्पुरती आणि कायमस्वरूपी नोंदणी

अ‍ॅपमध्ये शेतकऱ्यांना दोन प्रकारच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

  • तात्पुरती नोंदणी : यामध्ये प्रत्येक वेळी जमीन व कागदपत्रांची माहिती भरावी लागते.
  • कायमस्वरूपी (Permanent) नोंदणी : AgriStack (ग्रीस्टॅक) प्रणालीशी जोडलेली असून एकदाच माहिती दिल्यानंतर पुढील योजना आपोआप उपलब्ध होतात.

आधार प्रमाणीकरण व KYC अनिवार्य

कायमस्वरूपी नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. OTP, फिंगरप्रिंट किंवा Face Aadhaar RD अ‍ॅपच्या माध्यमातून प्रमाणीकरण करता येते. प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती आपोआप भरली जाते.

कोणती योजना निवडायची?

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी PSS (Price Support Scheme) – चना Procurement रब्बी 2026 ही योजना निवडायची आहे. हीच योजना हरभरा हमीभाव खरेदीसाठी लागू राहणार आहे.

जमीन व बँक तपशील आवश्यक

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सर्वे नंबर, खाते नंबर, सातबारा उतारा (PDF/JPG – 10 MB पेक्षा कमी) अपलोड करणे आवश्यक आहे. AgriStack Farmer ID असल्यास जमीन तपशील आपोआप सिंक्रोनाईज होतो. बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

नोंदणी करताना आधारशी लिंक असलेला आणि AgriStack मध्ये नोंद असलेला मोबाईल नंबरच वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी व जलद होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करून हरभरा हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment