या जिल्ह्यांमध्ये15 जानेवारीपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याचे संकेत

प्रतिनिधी | शेती अपडेट

राज्यातील खरीप हंगामासाठीची अंतिम पैसेवारी एकामागून एक जाहीर होत असून अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्रता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔹 बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे इतकी आहे.

  • चिखली, शेगाव, जळगाव जामोद – 49 पैसे
  • लोणार, सिंदखेड राजा – 45 पैसे
  • उर्वरित तालुके – 46 ते 48 पैसे
    एकूण 13 तालुक्यांची सरासरी 47 पैसे नोंदवण्यात आली आहे.

🔹 अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील 1012 पैकी 990 गावांची पैसेवारी काढण्यात आली असून सर्वच गावांची पैसेवारी 50 पैशांखाली आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 48 पैसे इतकी आहे.

🔹 यवतमाळ जिल्हा

अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळांच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे.

  • सर्वाधिक – 49 पैसे
  • किमान – 46 पैसे
    बाबळगाव, आर्णी, दारव्हा, धिग्रस, मारेगाव, जरी-जामणी तालुक्यांमध्ये 46 पैशांची सर्वात कमी पैसेवारी नोंदवली आहे.

🔹 वाशिम जिल्हा

वाशिम जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे आहे.

  • मंगरुळपीर – 45 पैसे (सर्वात कमी)
  • रिसोड, वाशिम – 47 पैसे
  • कारंजा – 49 पैसे

🔹 गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्यात काही तालुक्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

  • गोरेगाव – 95 पैसे
  • अर्जुनी मोर – 87 पैसे
  • तिरोडा – 63 पैसे
  • आमगाव – 74 पैसे

पीक विमा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती

हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • अंतिम पैसेवारी व पीक कापणी प्रयोगाचा डेटा मिळाल्यानंतर
  • 21 दिवसांत पीक विमा वाटप बंधनकारक
  • 15 जानेवारीपासून विमा वाटप प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
  • विलंब झाल्यास विमा कंपन्यांवर 12% व्याज व दंडात्मक कारवाई होणार

राज्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, सांगली, धाराशिव या जिल्ह्यांचीही पैसेवारी 50 पैशांखाली असून उर्वरित जिल्ह्यांची माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment