१० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा २०२६च्या तारखा जाहीर! विद्यार्थ्यांनी करा तयारीची शर्यत सुरू

शिक्षण

पुणे (गावी गावो महाराष्ट्र न्यूज): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १२ वी व १० वी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून १२ वीची लेखी परीक्षा कालावधी १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षेसह) तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या दरम्यान होणार आहे.

बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन, तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी २०२६ ते ९ फेब्रुवारी २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) दरम्यान होणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *